Challenge action against encroachment | अतिक्रमणविरोधी कारवाईला आव्हान
अतिक्रमणविरोधी कारवाईला आव्हान

नाशिक : महानगरपालिका प्रशासनाने सातपूर-अंबड लिंकरोडवरील अनधिकृत बांधकामे आणि बेकायदेशीर व्यवसाय हटविण्यासाठी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी केली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिक संतप्त झाले असून, त्यांनी शनिवारी (दि. २४) इदगाह मैदान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत मोर्चा काढून सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांवर कारवाई केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देत
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अतिक्रमण विरोधी कारवाईला आव्हान दिले आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाची संभाव्य कारवाई लक्षात घेऊन सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांनी काळ्याफिती लावून मनपा प्रशासनाचा निषेध नोंदवितांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन परिसराचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करण्यासाठी समिती नेमण्याची मागणी केली आहे. चुंचाळे शिवारातील सर्व्हे नंबर ४४० आणि ४४३ मध्ये अनधिकृत भंगार व्यवसाय, अनधिकृत बांधकामे वाढत गेल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मनपा प्रशासनाने २०१७ मध्ये पोलीस बंदोबस्तात कारवाई केली होती. मात्र व्यावसायिकांनी परत अतिक्रमण केल्याने पुन्हा अतिक्रमण हटवण्यात आले. त्यानंतर महानगरपालिकेने ठिकठिकाणी फलक लावून बेकायदेशीर व्यवसाय, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण करू नये, असे सूचित केले होते. या सूचनेकडे दुर्लक्ष करून या जागेवर पुन्हा विनापरवाना अनधिकृत बांधकामे करण्यात आल्याचे दिसून येत असल्याने महापालिका प्रशासनाचे या अतिक्रमाणांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे या भागातील व्यावसायिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेत रस्त्यावर उतरून आपली भूमिका मांडली. ईदगाह मैदान येथून सुरू झालेल्या मोर्चाचे आंबेडकर पुतळा येथे सभेत रूपांतर झाले. यावेळी अब्बास अली खान, अब्दुल रहिम बशीर शेख, रफिक सय्यद, राजू सय्यद, रमजान खान पठाण, हरप्रित सिंग यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व्यावसायिकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केल्यानंतर नाशिक ट्रेडस असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी असोसिएशनच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले.
सोमवारपासूनची मोहीम स्थगित?
सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार दुकानांची अतिक्रमणे येत्या सोमवारपासून हटविण्यात येणार होती, मात्र पोलिसांनी गणेशोत्सवामुळे पोलीस बंदोबस्त देण्यास नकार दिला. त्यामुळे सोमवारपासून (दि. २६) राबविण्यात येणारी मोहीम स्थगित करण्यात आल्याचे वृत्त आहे. याठिकाणी सुमारे ६५० दुकाने असून, त्यातील २३० दुकानांचा वापरात बदल असल्याने ते सील करण्याचा प्रशासनाचा प्रस्ताव आहे. मनपा आयुक्तांनी कारवाईसाठी सात पथकेही तयार केली होती.
राजकीय दबावातून कारवाईचा
आरोप
महानगरपालिका प्रशासनाकडून एका राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन सुडबुद्धीने कारवाई होत असल्याचा गंभीर आरोप सातपूर-अंबड लिंकरोडवरील व्यावसायिकांनी केला आहे. या भागात प्रदूषण निर्माण होईल किंवा सर्वसामान्यांना कोणत्याही प्रकारचा
त्रास होईल, असा परिसरात कोणताही व्यवसाय सुरू नसल्याचा दावाही असोसिएशनने निवेदनाच्या माध्यमातून केला आहे.

Web Title:  Challenge action against encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.