त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील चाकोरे येथील शेतकरी सुका महादू खाडे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करीत जखमी केले. खाडे हे आपल्या गव्हाच्या शेतात दुपारी अडीचच्या सुमारास गव्हाकडे चक्कर मारण्यासाठी गेले होते. त्यांच्यासमवेत पाळीव कुत्रा आणि हातात कुºहाड होती.गव्हाच्या शेती शेजारीच जंगल असल्याने गव्हाच्या बांधावर उभे असताना अचानक जंगलात दडून बसलेल्या बिबट्याने झेप घेऊन खाडे यांना जखमी केले. त्यांच्यावर त्र्यंबकेश्वर येथे उपचार सुरू आहेत. खाडे यांना अत्यंत खोलवर जबड्यातील सुळे रुतलेले आहेत. नाकाजवळ डाव्या हाताच्या दोन्ही बाजू व कमरेजवळ खोल जखमा आहेत. बिबट्याने कुत्र्यावर झेप घेतली; पण ती झेप सुका याच्यावरच पडली. खाडे यांच्या हात व पाय तसेच पाठीला जखमा झाल्या आहेत.
चाकोरेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 00:06 IST
त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील चाकोरे येथील शेतकरी सुका महादू खाडे यांच्यावर बिबट्याने अचानक हल्ला करीत जखमी केले.
चाकोरेत बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला
ठळक मुद्दे दडून बसलेल्या बिबट्याने झेप घेऊन खाडे यांना जखमी केले.