मालेगावी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे चक्का जाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 14:34 IST2021-02-06T14:33:50+5:302021-02-06T14:34:06+5:30

मालेगाव : शहरातील नवीन बसस्थानका समोरील जुना आग्रा रोड वर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले.  

Chakka Jam by Malegaon National Muslim Front | मालेगावी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे चक्का जाम

मालेगावी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चातर्फे चक्का जाम

मालेगाव : शहरातील नवीन बसस्थानका समोरील जुना आग्रा रोड वर राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी चक्का जाम आंदोलन केले.  शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत जाचक कायदे मागे घ्यावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव द्यावा अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पुढील आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. आंदोलनात मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना अब्दुल हमीद अन्सारी, जिल्हाध्यक्ष मोहम्मद युसुफ इलियास ,मालेगाव महानगराध्यक्ष शेख अकबर शेख अश्रफी, जावेद अन्वर ,सुफी नुरुलऐन साबरी, अल्ताफ किराणा वाला ,अश्फाक अहमद, फारूक फिरदोसी आदींसह पदाधिकारी सहभागी झाले होते.

Web Title: Chakka Jam by Malegaon National Muslim Front

टॅग्स :Nashikनाशिक