युवकावर चाकूहल्ला

By Admin | Updated: July 8, 2017 00:35 IST2017-07-08T00:35:09+5:302017-07-08T00:35:32+5:30

नाशिक : युवकावर दोघा संशयितांनी चाकूहल्ला केल्याची घटना होलाराम कॉलनीत घडली़

Chakahala on the young man | युवकावर चाकूहल्ला

युवकावर चाकूहल्ला

नाशिक : पैसे देण्यास नकार देणाऱ्या युवकावर दोघा संशयितांनी चाकूहल्ला केल्याची घटना होलाराम कॉलनीत बुधवारी (दि़५) रात्रीच्या सुमारास घडली़ सुमित रामबाबू मिश्रा (१९, रा़ कस्तुरबा झोपडपट्टी, शरणपूररोड) असे जखमी युवकाचे नाव आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित वैभव जवंजाळे व समीर कांबळे (दोघेही राक़स्तुरबा झोपडपट्टी) हे घरी आले व त्यांनी पैशांची मागणी केली़ या दोघांना पैसे देण्यास नकार देताच जवंजाळे याने खुर्ची, तर कांबळे याने सुमितच्या डोक्यात चाकू मारून दुखापत केली़

Web Title: Chakahala on the young man