शहरं
Join us  
Trending Stories
1
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
3
उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
4
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
5
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
6
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
7
Panchayat 3 ची झलक बघायची आहे? 'या' दिवशी रिलीज होणार सीरिजचा ट्रेलर
8
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
9
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
10
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद
11
शिंदे कट्टर शिवसैनिक, ते बंड करणारे नव्हते, पण...; देवेंद्र फडणवीसांनी पडद्यामागचं राजकारण सांगितलं
12
Success Story: ₹८५० च्या पगारावरून ₹५५,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, नशीब बदलणाऱ्या उद्योजकाची कहाणी
13
पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर; म्हणाले...
14
मृणाल दुसानीस इंडस्ट्रीत करणार कमबॅक?; सिनेकरिअरविषयी दिली मोठी हिंट
15
छत्रपती संभाजीनगरमध्ये २५ ईव्हीएम बंद पडली, परळीतही गोंधळ; टक्केवारीवर परिणाम
16
"उद्धव ठाकरेंचं स्वत:चं मेटावर्स जग, त्या जगाचे राजे तेच, नियमही त्यांचेच..."
17
Stock Market Opening Bell: Sensex-Nifty वर विक्रीचा दबाव, बाजार उघडताच गुंतवणूकदारांचे ₹४७.५ हजार कोटी बुडाले
18
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीचा अपघातात मृत्यू, बसने कारला धडक दिली अन्...
19
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
20
NPS: Retirement वर पाहिजेय ₹२ लाखांचं Pension? पाहा तुम्हाला किती करावी लागेल गुंतवणूक

लासलगाव  बाजार समितीत  नाफेडच्या कांदा खरेदीने चैतन्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:12 AM

येथील बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलात खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला.

लासलगाव : येथील बाजार समितीत नाफेडच्या कांदा खरेदीचा शुभारंभ नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. बाजार समितीत खरेदी केलेल्या पहिल्या कांदा ट्रॅक्टरचे पूजन नाफेड संकुलात खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष शांताराम नागरे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. यावेळी संचालक जनार्दन जगताप, अनिल घोटेकर, सुरेश रायते, शंकरराव कुटे, प्रकाश कापडी, शिवाजी जाधव, धोंडीराम धाकराव, मधुकर दरेकर, राजाराम दरेकर, संघाचे व्यवस्थापक प्रकाश भालेराव, नाफेडचे वरिष्ठ सहायक पी. के. चौबे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. या कांदा खरेदीसाठी लासलगाव खरेदी-विक्री संघाच्या माध्यमातून खरेदी-विक्रीची व्यवस्था पाहिली जाणार आहे. नाफेडच्या या कांदा खरेदीमुळे बाजारभावात सुमारे २०० ते २५० रुपये वाढ दिसून आली. दि. २० रोजी ६०० ते ६५० रुपये क्विंटलने विकला जाणारा कांदा नाफेडच्या आगमनाने ८०० रुपये क्विंटलवर पोहचला. शेतमालाचे भाव पडल्यावर केंद्र सरकारच्या वतीने किंमत स्थिरीकरण कोशातून शेतमाल खरेदी करण्याची योजना सरकार राबवत असते. सदरची कांदा खरेदी या योजनेंतर्गत होत असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी  दिली.  पुढील सहा महिन्यांच्या काळात कांद्याचा हंगाम नसल्याने हा कांदा साठवणूक करून आगामी काळात मोठ्या शहरांत विक्र ी करण्यात येणार आहे. उच्च प्रतीचा कांदा प्रचलित बाजारभावात सर्वोच्च दराने खरेदी करण्याचे आदेश केंद्र सरकारकडून दिले गेले असल्याची माहिती नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी यावेळी दिली. सदर कांदा विक्र ीचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ धनादेशाद्वारे देण्यात येणार आहेत. आजच्या प्रारंभीचा ट्रॅक्टर महेश दामू घोरपडे (रा. पाटोदा) यांच्या मालकीचा कांदा ७७० रुपये प्रतिक्विंटल या दराने खरेदी करण्यात आला.  सकाळच्या सत्रामध्ये ८१० रु पये प्रतिक्विंटल भावाने कांदा खरेदी केला गेला. दिलासाकांद्याला मिळणाºया अत्यल्प भावामुळे हैराण झालेल्या शेतकºयाला नाफेडच्या कांदा खरेदीने दिलासा मिळणार आहे. लासलगाव येथील नाफेड संकुलात सुमारे पंधरा हजार मेट्रिक टन कांदा साठवणुकीची व्यवस्था आहे. याशिवाय राष्ट्रीय बागवानी संघ यांच्याकडे सुमारे एक हजार मेट्रिक टन कांदा साठवला जाऊ शकतो. यावर्षी कांद्याचे उत्पादन भरपूर असल्यामुळे पिंपळगाव, कळवण आदी ठिकाणीही नाफेडच्या वतीने कांदा खरेदी करण्यात येणार आहे. सरकारने कांद्याचे भाव सुधारावेत म्हणून हे पाऊल उचलले आहे. सध्या उन्हाळ कांद्याचा काढणी हंगाम सुरू आहे.

टॅग्स :onionकांदा