वित्त आयोग अध्यक्षांनी घेतला आढावा
By Admin | Updated: January 18, 2015 01:04 IST2015-01-18T01:03:23+5:302015-01-18T01:04:34+5:30
वित्त आयोग अध्यक्षांनी घेतला आढावा

वित्त आयोग अध्यक्षांनी घेतला आढावा
नाशिक : राज्याच्या चवथ्या वित्त आयोगाचे अध्यक्ष जे. पी. डांगे यांनी नाशिक महापालिकेस भेट देऊन आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. डांगे शनिवारी नाशिकच्या दौऱ्यावर होते. त्यांनी विभागीय आयुक्तालयात बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी नाशिक महापालिकेस भेट दिली. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी त्यांंचे स्वागत केले. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी खातेप्रमुखांशी चर्चा करून आर्थिक आढावा घेतला. यावेळी मुख्य लेखापाल राजेश लांडे, उपायुक्त हरिभाऊ फडोळ, रोहिदास बहिरम, सहायक आयुक्त संतोष ठाकरे आदि उपस्थित होते.