सांगवीच्या सरपंचपदी परिघाबाई चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 00:17 IST2020-01-19T22:11:45+5:302020-01-20T00:17:19+5:30
सांगवी, ता. देवळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली.

देवळा तालुक्यातील सांगवीच्या सरपंचपदी परिघाबाई चव्हाण यांची बिनविरोध निवडीप्रसंगी तुळशीराम दळवी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश अहेर, रत्ना अहेर, पंडित बस्ते, अभिमन शेवाळे आदी़
उमराणे : सांगवी, ता. देवळा येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी परिघाबाई भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. आवर्तन पद्धतीने माजी सरपंच पंडित बस्ते यांनी राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त होते. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडल अधिकारी व्ही.जी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायत सदस्यांची विशेष बैठक घेण्यात आली.
निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी चव्हाण यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी जाहीर केले. याप्रसंगी उपसरपंच तुळशीराम दळवी, ग्रामपंचायत सदस्य दिनेश अहेर, रत्ना अहेर, पंडित बस्ते, अभिमन शेवाळे, सुनंदा ठोके, अनिता बस्ते, प्रमिला दळवी आदी उपस्थित होते.