Chadradharagarh burglary in Rasbihari area | रासबिहारी परिसरात चक्रधरनगरला घरफोडी
रासबिहारी परिसरात चक्रधरनगरला घरफोडी

पंचवटी : रासबिहारी परिसरात असलेल्या चक्रधरनगरमधील एका सदनिकेतील बंद फ्लॅटचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून रोकड तसेच सोन्या-चांदीचे दागिने असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि.२९) उघडकीस आली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घरफोडीबाबत चक्रधरनगर येथे राहणाऱ्या साईकलश सोसायटीतील सुनील वाल्मीक घडवजे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
गेल्या शुक्रवारी घडवजे हे निफाड तालुक्यातील उगाव येथे सासूरवाडीला गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद फ्लॅटला लावलेले कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश करीत दोन तोळे सोन्या-चांदीचे दागिने तसेच २५ हजार रुपयांची रोकड, असा ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घडवजे घरी परतल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसल्याने चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पंचवटी
पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


Web Title:  Chadradharagarh burglary in Rasbihari area
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.