येवला नगर परिषद कडून प्रमाणपत्र वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:21 IST2018-12-13T18:21:01+5:302018-12-13T18:21:37+5:30
येवला नगर परिषद येथे दीनदयाळ अंतोदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कौशल्या प्रशिक्षणा द्वारे रोजगाराची उपलब्धता या घटका अंतर्गत कोहिनूर टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांनी येवला शहरातील विद्यार्थीना शिवणक्लास व इलेक्ट्रीशियन या दोन कॉर्स पूर्ण करण्यात आले आहेत.मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,महिला व बालकल्याण सभापति शेख रईसाबानो मुश्ताक अहमद , नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले

येवला नगर परिषद कडून शिवणक्लास व इलेक्ट्रीशियन कोर्सचे प्रमाणपत्र वाटप करतांना मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,शंतनू वक्ते, रईसा शेख .
येवला : येवला नगर परिषद येथे दीनदयाळ अंतोदय योजना -राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत कौशल्या प्रशिक्षणा द्वारे रोजगाराची उपलब्धता या घटका अंतर्गत कोहिनूर टेक्नीकल इन्स्टिट्यूट यांनी येवला शहरातील विद्यार्थीना शिवणक्लास व इलेक्ट्रीशियन या दोन कॉर्स पूर्ण करण्यात आले आहेत.मुख्याधिकारी संगीता नांदूरकर,महिला व बालकल्याण सभापति शेख रईसाबानो मुश्ताक अहमद , नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले
मुख्याधिकारी नांदूरकर यांनी शहरातील गरीब गरजू नागरिकांना अभियान अंतर्गत मोफत कौशल्य प्रशिक्षण चा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले .कार्यक्र माचे संचालन सहा प्रकल्प अधिकारी शंतनु वक्ते यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रणव चव्हाण यांनी मानले.
कार्यक्र म यशस्वी करण्याकरिता सुषमा विखे,संदीप चव्हाण ,सौ कल्याणी यांनी परिश्रम घेतले
अभियानात विविध प्रशिक्षण शिकविन्यात येत असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करु ण देण्यात येतो तरी इछुक १५ते ४५ वयोगटातील लाभार्थी यांनी शंतनु वक्ते सहा प्रकल्प अधिकारी दीनदयाळ अंतोदय योजना -राष्टीय नागरी उपजीविका अभियान कक्ष येवला नगर परिषद येथे संपर्क साधवा असे आवाहन करण्यात आले आहे.