A ceremony of honor by the Swaraj Pratishthan | स्वराज प्रतिष्ठानतर्फे सन्मान सोहळा

स्वराज फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रांत योगदान देणाऱ्या महिलांचा ‘स्वराज तेजस्विनी सन्मान’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सन्मानार्थी महिला.

ठळक मुद्देअवयवदानाचा संकल्प : विविध क्षेत्रांतील महिलांचा गौरव

नाशिक : येथील स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्राचे औचित्य साधून विविध क्षेत्रात काम करणाºया महिला म्हणजेच तेजस्विनींचा स्वराज तेजस्विनी सन्मान पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे अवयवदान जागर अंतर्गत अनेक उपस्थितांनी अवयवदानाचा संकल्प केला.
या पुरस्कार सोहळ्यात ब्रह्माकुमारी वासंती दीदी, मेटच्या संचालिका शेफाली भुजबळ, अंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक शैलजा जैन, नगरसेविका संगीता गायकवाड, मोतीवाला कॉलेजच्या चेअरमन डॉ. अफसना फारूक मोतीवाला, स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखडी, उद्योजिका वृंदा लव्हाटे, सपना पारेख, आकार फॉउंडेशनच्या अनिता पाटील, फीडिंग इंडियाच्या अध्यक्ष पूनम कन्नव, डॉ. प्रणिता गुजराथी, डॉ. धनश्री हरदास, मिस टिन युनिव्हर्स इंडिया श्रिया तोरणे, फिटनेस एक्सपर्ट अंकिता पारेख, गायक
जुबी हरीनामे, वंदना रकिबे या सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्र मास डॉ. फराज मोतीवाला, माझी उपमहापौर शोभाताई छाजेड, डॉ. स्वानंद शुक्ला, नगरसेवक समीना मेमन, गोकुळ पिंगळे, अर्जुन टिळे, बाळासाहेब कांकराळे,
ब्रह्माकुमारी पुष्पाजी, मिस इंडिया इंटरनॅशनल शिल्पी अवस्थी, स्वप्नील तोरणे, नेहा खरे, राजू व्यास, विवेक रकिबे हे प्रमुख
पाहुणे उपस्थित होते. प्रास्ताविक अ‍ॅड. आकाश छाजेड यांनी
केले.

Web Title: A ceremony of honor by the Swaraj Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.