सीईओेंचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश
By Admin | Updated: December 2, 2014 00:47 IST2014-12-02T00:47:23+5:302014-12-02T00:47:23+5:30
जिल्हा परिषदेत बोगस पदवीधारक शिक्षक गुन्हे दाखल होणार

सीईओेंचे शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश
नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये राज्याबाहेरील विद्यापीठांच्या पदवी घेऊन रुजू झालेल्या बोगस शिक्षकांचा भरणा असल्याचे धक्कादायक वृत्त असून, याप्रकरणी संबंधित राज्याबाहेरील अशा मान्यता नसलेल्या विद्यापीठांचे प्रमाणपत्र देऊन जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झालेल्या शिक्षकांना शोधून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिले आहेत. येवला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एका शाळेत एका शिक्षकाने चक्क अलाहाबाद येथील विद्यापीठाचे प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेची नोकरी मिळविली असून, राज्याबाहेरील कोेणत्याही विद्यापीठाच्या पदवी व प्रमाणपत्रांना जिल्हा परिषदेच्या शासकीय सेवेत ग्रा' धरले जात नाही. मात्र काही वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झालेल्या जिल्'ातील तब्बल ५० हून अधिक शिक्षकांनी राज्याबाहेरील विद्यापीठांच्या पदवी व प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरीचा लाभ घेतल्याचे समजते. येवल्यातील प्रकरण तर थेट राज्यस्तरावरून जिल्हा परिषदेला विचारणा झाल्याने उघड झाले आहे. या शिक्षकांवर तत्काळ जिल्हा परिषदेला व शासनाला फसविल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी दिले आहेत. तसेच अशा किती शिक्षकांनी मान्यता नसलेल्या पदवी व प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषदेच्या सेवेत रुजू झाले आहेत, अशा शिक्षकांचाही शोध घेऊन त्यांच्यावर फौजदारी दाखल करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोगल यांना दिले आहेत. (प्रतिनिधी)