दिंडोरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 01:21 IST2020-07-14T19:58:47+5:302020-07-15T01:21:56+5:30
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले असून, तालुक्यात सोमवारपर्यंत १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. ५७ रु ग्ण ठणठणीत बरे झाले असून, ४९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.

दिंडोरी तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक
दिंडोरी : तालुक्यात कोरोनाने शतक पूर्ण केले असून, तालुक्यात सोमवारपर्यंत १०९ रुग्णांची नोंद झाली आहे. ५७ रु ग्ण ठणठणीत बरे झाले असून, ४९ रु ग्णांवर उपचार सुरू आहेत. यात तीन रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे.
तालुक्यात गेल्या महिनाभरापासून दररोज रुग्ण आढळत आहे. गेला शुक्र वार वगळता दररोज रु ग्ण वाढत आहे. सोमवारी रात्री दिंडोरी, अवनखेड व उमराळे बु।। येथे नवीन रु ग्ण आढळले आहेत. दररोजच्या वाढत्या रुग्णसंख्येने प्रशासनावरील ताण वाढत असून,
रु ग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेत त्यांना विलगीकरण कक्षात नेणे, कंटेन्मेंट झोन करणे, तेथे कर्मचारी नियुक्ती करणे, सर्वेक्षण करणे आदी कामकाज वाढत आहे. तालुक्यात रुग्णसंख्या तब्बल १०९ वर पोहचली असून, ५७ रु ग्ण बरे झाले आहेत. ४९ जणांवर उपचार सुरू आहेत.
रुग्णवाढीत नाशिक मार्केट, अंत्यसंस्कार व लग्नसमारंभ कनेक्शन पुढे येत असल्याने चिंता वाढत आहे.
जाहीर केलेला कंटेन्मेंट झोन व विविध निर्बंध रुग्ण ठणठणीत बरा होऊन घरी आल्यानंतर २८ दिवसांनंतर उठवले जात असून, ते परिसरातील रहिवासी व व्यावसायिकांसाठी अडचणीचे ठरत आहे. तेवढा काळ प्रशासनाला त्या भागात कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी लागत आहे. सदर निर्बंधाबाबत फेरविचार होण्याची गरज व्यक्त होत असून, हे निर्बंध फक्त संबंधित रुग्णाच्या राहत्या घराला लागू करण्यासह रुग्ण बरा होताच कंटन्मेंट झोन शिथिल करण्याचीही मागणी होत आहे. प्रशासन
सातत्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, नियम पाळावे, असे आवाहन करत आहे.
--------------------
देवगावला आढळला पहिला रु ग्ण
देवगाव : येथे कोरोनाची बाधा झालेला पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. भिवंडीत खासगी कंपनीत नोकरीला असणारा ३२ वर्षीय युवक पत्नीसह दोन दिवसांपूर्वी देवगावला आई-वडिलांना भेटण्यासाठी आला होता. त्याला ताप, सर्दीचा त्रास होऊ लागल्याने सोमवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याने तपासणी केली. कोरोनासदृश लक्षणे दिसल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ. पूजा लहाने यांनी पिंपळगाव बसंवत येथे जाण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान त्यांचे स्वॅब खासगी लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. मंगळवारी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.