शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या मेट्रो निओ प्रकल्पाला केंद्र सरकारची लवकरच मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 19:24 IST

नाशिक-  देशातील पहिला किफायतशीर टायरबेस्ड प्रकल्प म्हणजेच नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पासाठीं केंद्र शासनाने अर्थसंकल्पात दोन हजार काेटी रूपयांंची मान्यता दिल्यानंतर आता केंद्रशासनाच्या अर्थ खात्याअंर्तगत असलेल्या पब्लीक इन्व्हेन्समेंट बोर्डाने (पीआयबी) देखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र शासनाच्या अंतिम मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे.

ठळक मुद्देपीआयबीकडून शिक्कामोर्तबचार वर्षात पूर्ण हेाणार प्रकल्प

नाशिक-  देशातील पहिला किफायतशीर टायरबेस्ड प्रकल्प म्हणजेच नाशिकच्या निओ मेट्रो प्रकल्पासाठीं केंद्र शासनाने अर्थसंकल्पात दोन हजार काेटी रूपयांंची मान्यता दिल्यानंतर आता केंद्रशासनाच्या अर्थ खात्याअंर्तगत असलेल्या पब्लीक इन्व्हेन्समेंट बोर्डाने (पीआयबी) देखील अनुकूलता दर्शवली आहे. त्यामुळे आता लवकरच केंद्र शासनाच्या अंतिम मान्यतेचा मार्ग मोकळा झाला आहे.

नाशिक शहरासाठी असलेला हा एकमेवव्दितीय आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प आहे. पीआयबीच्या मान्यतेनंतर केंद्र शासनाच्या आवास  आणि शहरी कार्य मंत्रालयाचे सचिव दुर्गाशंकर मिश्रा यांनी तसेच महामेट्रोचे महासंचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी केंद्र शासनाची अंतिम मान्यता लवकरच प्राप्त होणार असूनत्यांनी महामेट्रोच्या अधिकारी वर्गाला कामाची रुपरेषा तयार करून काम सुरु करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधीत विभागांना देण्यात आल्या आहेत, असे सांगितले. तर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी या प्रसंगी हा प्रकल्प नाशिक शहराचे भविष्य बदलविणारा असून त्यामुळे प्रकल्पासाठी सहकार्य केले जाईल असे अश्वासन दिले आहे.

केंद्र शासनाने निओ मेट्रो प्रकल्पास मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकारला देखील त्यात गुंतवणूक करावी लागणार आहे. केंद्रात भाजपा तर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने राज्य सरकारच्या आर्थिक सहभागाविषयी शंका व्यक्त केली जात होती. मात्र,राज्य सरकारने देखील आवश्यक ती आर्थिक तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात केली आहे.

केंद्र आणि राज्य शासनाचा संयुक्त प्रकल्प असलेल्या महामेट्रोच्या या प्रकल्पासाठी २०१८ पासून नाशिक शहरात चाचपणी करण्यात आली तसेच २ हजार ९२ कोटी रूपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासन, राज्य शासन, सिडको आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त प्रयत्नातून नाशिक शहरासाठी ३३ किमीचा मेट्रो निओ मार्ग बनवण्यात येणार आहे. गंगापूर ते मुंबई नाका आणि गंगापूर ते नाशिक रेल्वे स्थानक अशा ३३ किमीच्या दोन मार्गिकांमध्ये एकूण ३० स्थानके असणार आहेत. हा प्रकल्प ४ वर्षांत पूर्ण होईल. नाशिक मेट्रो निओ प्रकल्प हा नाविन्यपूर्ण अश्या रबर टायर बस वापरून जलद प्रवासाची सुविधा देण्यात येणार आहे. या रबर टायर बस ओव्हरहेड इलेक्ट्रिक द्वारा चालवण्यात येतील. संपूर्ण ३३ किमीची मार्गिका उन्नत असेल, त्यामुळे शहरातून या बस विनासायास व जलद गतीने प्रवास करू शकतील. नाशिक शहराच्या प्रवासी संख्यालक्ष्यात घेऊन या प्रकारचा नाविन्यपूर्ण मेट्रो निओ प्रकल्प योजण्यात आला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाMetroमेट्रोCentral Governmentकेंद्र सरकार