केंद्र सरकारने कांदा खरेदी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 10:23 PM2020-05-10T22:23:16+5:302020-05-10T22:23:55+5:30

नाशिक : यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होणार असून, आताच आवक वाढू लागल्याने कांद्याचे दर कोसळू लागले आहेत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक कांदा खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.

The central government should buy onions | केंद्र सरकारने कांदा खरेदी करावी

केंद्र सरकारने कांदा खरेदी करावी

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : सरकारला पाठविले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : यंदा कांद्याचे बंपर उत्पादन होणार असून, आताच आवक वाढू लागल्याने कांद्याचे दर कोसळू लागले आहेत, अशा परिस्थितीत केंद्र सरकारने नाफेडच्या माध्यमातून अधिकाधिक कांदा खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
या संदर्भात दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शेतकºयांनी केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचा भाग हा कृषिप्रधान असून, येथे कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.
यावर्षी कांदा उत्पादन मोठ्या प्रमाणावर होण्याचे अनुमान आहे. जगभरात कोरोना विषाणूचे संकट बघता कांदा उत्पादकांना येणाºया काळात अनेक संकटांना तोंड द्यावे लागण्याची भीती असून, कमी दर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाफेडमार्फत खरेदी करण्याची मागणी करण्यात आली आहे. खासदार भारती पवार यांनीही केंद्र सरकारकडे अशीच मागणी केली आहे.आर्थिक संकटातून शेतकरी वाचविणे गरजेचेमागील वर्षी नाफेडद्वारा ५७२३१.७७ मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली होती. यावर्षीही नाफेडद्वारा ५०००० मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पण मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी मोठ्या प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होणार असल्याचे अनुमान आहे. त्यामुळे शेतकºयांचे हित बघता केंद्र सरकारने उचित दरात कांदा खरेदी नाफेडमार्फत करावी जेणेकरून शेतकºयाला या संकटातून वाचविता येईल, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: The central government should buy onions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.