केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी कळवणला सर्वपक्षीय आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 14:56 IST2020-09-15T14:55:54+5:302020-09-15T14:56:59+5:30
कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत कळवण बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले.

कळवण येथे बस स्थानकाजवळ कांदा निर्यात बंदी उठवावी या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन प्रसंगी बोलतांना शेतकरी नेते देविदास पवार व उपस्थित सर्वपक्षीय नेते.
कळवण : जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याला चांगला भाव मिळू लागल्याने केंद्र सरकारच्या पोटात पोटसुळ उठला आहे. त्यामुळे केंद्राने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याची टीका करु न शेतकरी संघटनेसह कांदा उत्पादक संघटना व सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत कळवण बस स्थानकाजवळ रस्त्यावर काही काळ ठिय्या मांडून रस्ता रोको आंदोलन केले.
शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार, जेष्ठ नेते रविंद्र देवरे, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शेतकरी नेते शांताराम जाधव, स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, कांदा उत्पादक संघटनेचे तालुकाध्यक्ष विलास रौंदळ, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात भाषणबाजी करु न आंदोलन केले.
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने कळवण तालुक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कांद्याचा पूर्ण हंगाम शेतकºयांचा वाया गेला असतांना फक्त २ ते ४ रु पये किलो भाव मिळत होता. शेतकºयांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नव्हता, भाव मिळतील या अपेक्षेने कांदा साठवला तो ही चाळीत सडला. थोडाफार शिल्लक राहिला. त्याला समाधानकारक दर मिळतो आहे. पण, झालेलं नुकसान बघता, शेतकºयांच्या हातात काही राहणार नाही.
त्यात निर्यात बंदीमुळे भाव पडले. तर शेतकºयांना मिळत असणाºया गवताच्या काडीचा आधारही जाईल आणि कांदा उत्पादक शेतकरी उध्वस्त होतील अशी भीती यावेळी उपस्थितमान्यवरांनी व्यक्त करु न निर्यात बंदी उठवावी अशी मागणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांना निवेदन देण्यात आले.
रस्ता रोको आंदोलनात घनश्याम पवार, पोपट पवार, जितेंद्र पगार,भाऊसाहेब पवार, प्रदीप पगार, टिनू पगार, दादा जाधव, रामा पाटील, मधुकर वाघ, रमेश पाटील, जगन पाटील, प्रल्हाद देवरे, संदीप वाघ, गोरख देवरे, महेंद्र पवार, काशिनाथ गुंजाळ, दिलीप शेवाळे, अमोल रौंदळ, राहूल पवार, नितीन पवार, वैभव देवरे, नितीन खैरनार आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.