निफाड तालुक्यात २०० खाटांचे केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:38 IST2021-04-20T22:32:20+5:302021-04-21T00:38:40+5:30
लासलगाव : निफाड तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, लासलगाव येथे दोन तर उगाव व सायखेडा याठिकाणी प्रत्येकी ५० खाटांचे ...

निफाड तालुक्यात २०० खाटांचे केंद्र
लासलगाव : निफाड तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, लासलगाव येथे दोन तर उगाव व सायखेडा याठिकाणी प्रत्येकी ५० खाटांचे कोविड केंद्र उभारण्यास पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मान्यता दिली आहे.
सध्या निफाड तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २,९७७ इतकी आहे. आता चार ठिकाणी प्रत्येकी ५० खाटा मंजूर झाल्याने लवकरच कार्यान्वित होऊन २०० रुग्णांवर उपचार होण्यास मोलाची मदत होणार आहे. लासलगाव येथे रॉयल पॅलेस मंगल कार्यलय व लोकनेते दत्ताजी पाटील विद्यालय येथे तसेच उगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यालय व सायखेडा येथे षटोकाचार्य महाविद्यालयात अशा चार ठिकाणी केंद्र सुरू होणार आहेत.