नाशकात ‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 17:33 IST2018-02-14T17:30:10+5:302018-02-14T17:33:34+5:30

 Celebration of 'Valentine's Day' loud in Nashik | नाशकात ‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन जोरात

नाशकात ‘व्हॅलेंटाइन डे’ चे सेलिब्रेशन जोरात

ठळक मुद्देमनोरंजनावर भर  गुलाबासह आइस्क्रीम अन् गिफ्टला पसंती


नाशिक :एकमेकांप्रती असणारे प्रेम, जिव्हाळा व्यक्त करीत तरुणाईसह ‘प्रेम’ भावनेवर मनापासून प्रेम करणाºया अबालवृद्धांनी बुधवारी (दि.१४) व्हॅलेंटाइन दिन आपल्या खास नियोजनाप्रमाणे उत्साहात साजरा केला. आपल्या प्रिय व्यक्तींना भेटवस्तू देत नात्याची वीण घट्ट करण्याचा प्रयत्न केलेला पाहण्यात आला. जवळपासच्या पर्यटनस्थळांवर सेल्फीचा आनंद घेत, प्रियजनांना निरनिराळ्या आकर्षक भेटी देत व्हॅलेंटाइन डेच्या सेलीब्रेशनला सुरवात झाली होती. काहींनी सिनेमा, हॉटेलिंग, काहींनी शॉपींग तर काहींनी जिवलगांशी भरभरुन गप्पा मारत हा दिवस साजरा केला. काहींनी मैत्रीच्या नात्याचे प्रेमाच्या नात्यात रूपांतर करण्यासाठी आवडत्या मित्र-मैत्रिणींकडे ‘रेड रोझ’ देत प्रियकर-प्रेयसी होण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच प्रियकर-प्रेयसींनी प्रेमाच्या नात्याला अधिकाधिक फुलविण्याचे एकमेकांना वचनही दिले. दरम्यान, व्हॅलेंटाइन डे सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाईने गंगापूर धरणाचा बॅक वॉटर, सोमेश्वर, खंडोबा टेकडी, फाळके स्मारक, पांडवलेणी, नेहरू वनोद्यान, अंजनेरी, त्र्यंबकेश्वर, रामशेज, नांदूरमध्यमेश्वर यांसारख्या निसर्गरम्य ठिकाणांना भेटी दिल्या. सायंकाळनंतर कॉलेजरोड परिसर मात्र तरुणाईने ओसंडून वाहत होता. सर्वच स्नॅक्सची दुकाने, आइस्क्रीम पार्लर, चाटच्या दुकानांसह गिफ्ट शॉपीमध्ये गर्दी दिसून आली.
 

Web Title:  Celebration of 'Valentine's Day' loud in Nashik