बोरवठ येथे राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 15:35 IST2020-12-23T15:34:27+5:302020-12-23T15:35:23+5:30
पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्र्टीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गांवातील १३ बचत गटातील महिलासाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोग शाळा आयोजित केली होती.

बोरवठ येथे शेतकरी दिना निमित्त उपस्थित महिला बचत गटाच्या सदस्यांसह पद्माकर कामडी, सोनाली कामडी, मुकेश महाजन आदी.
ठळक मुद्दे महिलांना थैली, मास्क, वही, पेन इत्यादी साहित्य वाटप
पेठ : तालुक्यातील बोरवट ग्रामपंचायत येथे राष्र्टीय शेतकरी दिवस साजरा करण्यात आला. गांवातील १३ बचत गटातील महिलासाठी तालुका कृषी विभागाकडून शेती विषय प्रयोग शाळा आयोजित केली होती.
याप्रसंगी बचत गटाच्या महिलांना थैली, मास्क, वही, पेन इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी महिलांना शेतीची माहिती देण्यात आली. याप्रसंगी सरपंच सोनाली पदमाकर कामडी, कृषी मंडल अधिकारी मुकेश महाजन, कृषी सहाय्यक कडलग, आहिरे, बोरवट सहकारी संस्थेचे चेअरमन पदमाकर कामडी, संतोष पाटील, सुरेंद्र राऊत, तुषार राऊत यांच्यासह ग्रामसंघ, बचत गटाच्या महिला अध्यक्ष, सचिव, सदस्य आदी उपस्थित होते.