महिलांसाठी आयोजित  सजावट स्पर्धा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 00:32 IST2019-09-19T00:32:01+5:302019-09-19T00:32:20+5:30

दत्तमंदिररोड येथील नागरिक वाचनालयाच्या सभागृहात देशमुख मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सण, उत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे उपस्थित होत्या.

 In celebration of the decoration competition organized for women | महिलांसाठी आयोजित  सजावट स्पर्धा उत्साहात

महिलांसाठी आयोजित  सजावट स्पर्धा उत्साहात

नाशिकरोड : दत्तमंदिररोड येथील नागरिक वाचनालयाच्या सभागृहात देशमुख मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सण, उत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामिनी तनपुरे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून वासंती ठाकूर, आश्विनी न्याहारकर, सीमा पाटील, अर्चना बोरस्ते, नगरसेविका संगीता गायकवाड, सुरेखा गणोरे आदी उपस्थित होत्या.
या स्पर्धेत महिलांनी गुढीपाडवा सणापासून ते होळीपर्यंतच्या सणाचा देखावा व त्याविषयी माहिती सादर केली. यावेळी स्पर्धेतील विजेत्या महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रास्तविक नलिनी कड यांनी केले. सूत्रसंचालन ज्योती कदम व आभार अ‍ॅड. वर्षा देशमुख यांनी मानले. यावेळी वृंदा देशमुख, उज्ज्वला देशमुख, सीमा देशमुख आदींसह महिला उपस्थित होत्या.
स्पर्धेतील विजेते : घटस्थापना-अमृता व पल्लवी देशमुख, लक्ष्मीपूजन - विजया व स्नेहल देशमुख, गोकुळाष्टमी- संगीता देशमुख, ऋ षिपंचमी - पूजा व सविता देशमुख, आषाढी एकादशी - जया व संध्या देशमुख, महालक्ष्मी - नम्रता तनपुरे, मनाली देशमुख, गणपती - श्वेता, स्मिता, मीना भोसले, शैला देशमुख, पोळा - शालिनी देशमुख.

Web Title:  In celebration of the decoration competition organized for women