जागतिक सायकलिंग डे साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 01:05 IST2021-06-03T17:50:15+5:302021-06-04T01:05:22+5:30
सटाणा : बागलाण सायकलिस्टच्या वतीने गुरुवारी (दि.३) जागतिक सायकलिंग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक सायकलिंग दिवसानिमित्त सटाणा ते सावकी सायकल रॅलीत सहभागी झालेले बागलाण सायकलिस्टचे सदस्य.
सटाणा : बागलाण सायकलिस्टच्या वतीने गुरुवारी (दि.३) जागतिक सायकलिंग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक सायकलिंग दिवसच्या निमित्तानेसमाजामध्ये सायकलिंग बाबत जनजागृती व्हावी सायकलिंगचे महत्व पटावे तसेच लोकांनी सायकल वापरण्याकडे आपला कल वाढवावा असा संदेश देण्यासाठी बागलाण सायकलिस्टच्या वतीने सटाणा ते खामखेडा - सावकी - सटाणा अशी सुमारे २८ किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला.
"दोन चाकं, कार्य महान.. करतात सोबत, देतात तब्बेतीला साथ... करा संगत त्या सायकलीची, होईल मदत पर्यावरणाची, लाभेल सर्वांना एक अनमोल हाथ..." असा संदेश सायकल रेलीद्वारे देण्यात आला.
सायकल रेलीत बागलाण सायकलिस्ट च्या वतीने डॉ. विशाल आहिरे पाटील, नितीन जाधव, डॉ. अतुल जाधव, डॉ. किरण पवार, डॉ. विश्वास देवरे, डॉ. संदिप ठाकरे, डॉ. रवींद्र सुयवंशी, डॉ. संदेश निकम, डॉ. महेंद्र कोठावदे, डॉ. सतीश आहिरे, विनोद शिरसाळे, दिपक सोनवणे, प्रशांत रौंदळ, मोहन सुर्यवंशी, संजय सोनवणे, सचिन सोनवणे, हेमंत पाटील भदाणे आदी सहभागी झाले होते.