सांस्कृतिक भवन गृपचा वर्धापन दिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 21:03 IST2019-04-26T21:02:59+5:302019-04-26T21:03:15+5:30

नाशिक : येथील सांस्कृतिक भवन ह्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा पहिला वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.

Celebrating the anniversary of the cultural building | सांस्कृतिक भवन गृपचा वर्धापन दिन उत्साहात

सांस्कृतिक भवन गृपचा वर्धापन दिन उत्साहात

ठळक मुद्देवर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा

नाशिक : येथील सांस्कृतिक भवन ह्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा पहिला वर्धापन दिन विविध उपक्रमाद्वारे साजरा करण्यात आला.
कालिदास कला मंदिरातील हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी गृपच्या प्रमुख वर्षा डांगरीकर यांनी स्वागत केले व गृपचा वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. या संमेलनासप्रमुख पाहुण्या म्हणून नाट्य क्षेत्रातील अग्रणी माधुरी कुलकर्णी उपस्थित होत्या.
यावेळी जमलेल्या सर्व कलाकारांनी आपली ओळख तसेच आपल्या मनातील विचार, भावना व्यक्त केल्या. त्यानंतर काहींनी गाणी म्हटली, माऊथ आॅर्गन वाजवला तर काहींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन अविनाश वानकर यांनी तर विपुल आपटे यांनी आभार प्रदर्शन केले.
यावेळी योगिता गवांदे, प्रसाद धोपावकर, निशा काथवते, अजित जाधव, अशोक जोशी उपस्थित होते. समारंभ यशस्वीतेसाठी ईश्वर जगताप, संगीता दातार, अंजना जोशी, सागर येलमामे, मधुवंती तांबट, श्रीकांत अरगडे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Celebrating the anniversary of the cultural building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक