विविध सामाजिक संघटनांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 00:08 IST2019-03-25T00:08:16+5:302019-03-25T00:08:30+5:30
शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़

विविध सामाजिक संघटनांतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी
नाशिक : शहरातील विविध सामाजिक संस्था संघटनांच्या वतीने तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली़ यानिमित्त छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले़ जुने नाशिक येथील मृत्युंजय मित्रमंडळ प्रणित विराम वस्ताद तालीम संघ, कथडा यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.यावेळी तालमीचे अध्यक्ष गोविंदा कहार, मंडळाचे अध्यक्ष आकाश भास्कर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला़ यावेळी संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी भगवे ध्वज लावून परिसर भगवामय झाला होता़ यावेळी रामदास बिरूटे, संकेत दारुणकर, गोपाल कहार, सुमित पाटील, राहुल पिठे, सागर पिठे, धनंजय सानप, राहुल बिरूटे आदी उपस्थित होते़ दरम्यान, सिडको, सातपूर, इंदिरानगर, पंचवटी भागांतही विविध सामाजिक संघटनांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
राजमुद्रा सोशल फाउंडेशन
राजमुद्रा सोशल फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली़ जैन गुरुकुल वसतिगृह येथील मुलांना शिवकालीन प्रसंगावरील पेंटिंगची माहिती देण्यात आली़ यावेळी प्रथमेश दारूणकर, गौरव दारूणकर, रोशन उगले, श्याम काळे, योगेश शेलार आदी उपस्थित होते़