जागतिक क्षमा दिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:10 IST2021-07-04T04:10:36+5:302021-07-04T04:10:36+5:30

बेरोजगार घटकांना आर्थिक मदतीची मागणी नाशिक : नाशिक जिल्हा घडशी समाज संघाअंतर्गत काम करणारे मजूर, वेल्डर, फुल विक्रेते, सनई ...

Celebrate World Forgiveness Day | जागतिक क्षमा दिवस साजरा

जागतिक क्षमा दिवस साजरा

बेरोजगार घटकांना आर्थिक मदतीची मागणी

नाशिक : नाशिक जिल्हा घडशी समाज संघाअंतर्गत काम करणारे मजूर, वेल्डर, फुल विक्रेते, सनई चौघडा वादक, बँड पथक अशा विविध मजूर कामगारांना कोरोनामुळे गेल्या १८ महिन्यांपासून कोणताही रोजगार उरलेला नाही. त्यामुळे अशा मजूर कामगारांना शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी नाशिक जिल्हा घडशी समाज संघातर्फे पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

---

भोसला गर्ल्स स्कूलचा वर्धापन दिन उत्साहात

नाशिक : भोसला मिलिटरी स्कूल गर्ल्स शाळेचा ८ वा वर्धापन दिन गणेशवंदना करून ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी गणपती पूजन करण्यात आले. यावेळी कमांडंट मेजर एम. एम. मसूर, शाळेच्या अध्यक्षा वसुधा कुलकर्णी, शाळेचे पालक मिलिंद वैद्य उपस्थित होते. प्राचार्या साक्षी भालेराव यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Celebrate World Forgiveness Day