शेतीच्या बांधावर शिक्षक दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:18 IST2021-09-06T04:18:51+5:302021-09-06T04:18:51+5:30
यावेळी दिंगबर भेरे या विद्यार्थ्याने श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतनचे प्राचार्य पद सांभाळले, तर वैष्णवी जाधव हिने ज्युपीटर इंग्लिश मीडियम स्कूलचे ...

शेतीच्या बांधावर शिक्षक दिन साजरा
यावेळी दिंगबर भेरे या विद्यार्थ्याने श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतनचे प्राचार्य पद सांभाळले, तर वैष्णवी जाधव हिने ज्युपीटर इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य पद सांभाळले. शेतीच्या बांधावर असलेल्या झाडाखाली फळा लावण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन विषयांवार मार्गदर्शन करण्यात आले. ऋचिका गायकवाड हिनेही मार्गदर्शन केले. ज्येष्ठ नेते सुधाकर चारोस्कर, शांताराम जाधव, श्रीराम जाधव, सिताराम जाधव, पोपट चौघुले, पंडित जाधव, भय्या जाधव यांची भाषणे झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांंच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सुसंस्कारित होऊन दिंडोरी शहराचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन सुधाकर चारोस्कर यांनी केले. यावेळी विद्यार्थी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास नीलेश खरे, दीपाली पागे, शीतल पाटील, अजित पगारे, गायत्री बोके, विद्या शार्दुल यांनी मार्गदर्शन केले. करोनामुळे शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा प्रवाह सोडू नये, असे आवाहन शांताराम जाधव यांनी केले.
फोटो- ०५ दिंडोरी फार्मर
श्री ईशान्येश्वर विद्यानिकेतन व ज्युपीटर इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शेतीच्या बांधावर शिक्षक दिन साजरा केला. यावेळी शिकविताना वैष्णवी जाधव.
050921\05nsk_33_05092021_13.jpg
फोटो- ०५ दिंडोरी फार्मर