जनता विद्यालयात समाज दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:18 IST2021-08-20T04:18:55+5:302021-08-20T04:18:55+5:30
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश राजोळे होते. व्यासपीठावर संस्थेचे सभासद रामनाथ भगुरे, स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र राजोळे, ...

जनता विद्यालयात समाज दिन साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश राजोळे होते. व्यासपीठावर संस्थेचे सभासद रामनाथ भगुरे, स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र राजोळे, धोंडीराम भगुरे, प. समिती माजी सभापती शहाजी राजोळे, मविप्र सभासद सोमनाथ राजोळे, कारभारी राजोळे, भरत पगार, रवींद्र लोहकरे, वासुदेव जाधव, सुनीता राजोळे, माया लोहकरे, मुख्याध्यापक व्ही. एस. कदम उपस्थित होते.
प्रथम संस्थेच्या ध्वजाचे पूजन व ध्वजारोहण रामनाथ भगुरे यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाच्या गीतमंचाने संगीत शिक्षक एस. व्ही. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रगीत व समाजगीत म्हटले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज, माता सरस्वती व संस्थेच्या सर्व कर्मवीरांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एस. कदम यांनी केले. प्रास्ताविकात संस्थेची स्थापना व कर्मवीरांच्या कार्याचा गौरव केला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार शालेय परिवाराच्यावतीने करण्यात आला. शिक्षकांच्यावतीने एस. एच. जाधव, राजेंद्र राजोळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते लिली वनस्पती रोपांचे रोपण करण्यात आले. सूत्रसंचालन एस. एन. कदम व आर. जी. अडसरे यांनी तर आभार के. डी. सानप यांनी मानले.