बाणेश्वर मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:30 IST2018-02-17T00:30:27+5:302018-02-17T00:30:52+5:30
परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिराचा रौप्यमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. बाणगंगा नदीच्या काठावर मौजे सुकेणे येथे बाणेश्वर मंदिर आहे. ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला.

बाणेश्वर मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा
कसबे सुकेणे : परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मौजे सुकेणे येथील बाणेश्वर मंदिराचा रौप्यमहोत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. बाणगंगा नदीच्या काठावर मौजे सुकेणे येथे बाणेश्वर मंदिर आहे. ग्रामस्थांच्या वतीने मंदिराचा रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह, पारायण, अभिषेक, आरती असे धार्मिक कार्यक्रम पार पडले. पूज्य महामंडलेश्वर शिवगिरी महाराज यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी मौजे सुकेणेचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.