जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 15:36 IST2018-02-19T15:36:07+5:302018-02-19T15:36:21+5:30
नाशिक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली.

जिल्ह्यात शिवजयंती उत्साहात
नाशिक : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती जिल्ह्यात उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी भगव्या पताका लावून आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. ‘जय भवानी..जय शिवाजी’च्या घोषणा देण्यात येत होत्या. सकाळपासून ठिकठिकाणी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाड्यांची ध्वनिफीत लावण्यात आल्याने आणि भगवे ध्वज व पताके लावण्यात आल्याने परिसरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. सटाण्यात शिवजयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे मोटारसायकल रॅली काढण्यात आली.