ऑनलाइन वन महोत्सव सप्ताह साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:10 IST2021-07-22T04:10:54+5:302021-07-22T04:10:54+5:30
या महोत्सवाच्या निमित्ताने मुलांना आपल्या निसर्गाची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रेरित केले गेले. वाहतूक पोलीस निरीक्षक नियुक्तीची प्रतीक्षा पंचवटी : ...

ऑनलाइन वन महोत्सव सप्ताह साजरा
या महोत्सवाच्या निमित्ताने मुलांना आपल्या निसर्गाची काळजी घेण्याच्या दृष्टीने प्रेरित केले गेले.
वाहतूक पोलीस निरीक्षक नियुक्तीची प्रतीक्षा
पंचवटी : शहर वाहतूक शाखेच्या पंचवटीतील युनिट एक विभागाला वाहतूक पोलीस निरीक्षक नसल्याने गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे . वाहतूक पोलीस निरीक्षक नसल्याने गेल्या काही दिवसांपासून प्रभारी पोलीस निरीक्षकांना वाहतूक शाखा युनिट एकचा कारभार सांभाळावा लागत आहे. युनिट एक कार्यालयात यापूर्वी पोलीस निरीक्षक नेमण्यात आले होते; मात्र त्यांचे निधन झाल्याने काही दिवस शाखेत पोलीस निरीक्षक कार्यरत नव्हते; मात्र त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात एका वाहतूक पोलीस निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे वाहतूक शाखेच्या दोन विभागाचा कार्यभार आहे.
दादांच्या नावासाठी दादांना साकडे
नाशिक : ओझर येथील विमानतळाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचे नाव द्यावे, या मागणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करावा, असे साकडे राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांना समितीच्यावतीने घालण्यात आले. यासंदर्भात भुसे यांना निवेदन देण्यात आले आहे. याबाबत पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले. यावेळी अण्णासाहेब कटारे, विलास पवार, बाळासाहेब शिंदे, दीपचंद दोंदे, मदन शिंदे, आदेश पगारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
घराजवळ काढली दिंडी
नाशिक : कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून पंढरपूरला जाता येत नसल्याने यंदाच्या आषाढीला कैलास महाराज वेलजाळी यांनी घरातच विठ्ठल मूर्तीची स्थापना करून सजावट करत अनोख्या पद्धतीने आषाढी साजरी केली. वेलजाळी दरवर्षी पायी वारीला जातात; मात्र मागील दोन वर्षांपासून त्यांना वारीलाही जाता आलेले नाही. आषाढीच्या दिवशी त्यांनी घराजवळच छोटी दिंडी काढून घरात कीर्तनाचा कार्यक्रम करून विठ्ठल मूर्तीची पूजा करत आषाढी साजरी केली.
१२०० लोकांनी घेतला खिचडीचा लाभ
नाशिक : आषाढी एकादशीनिमित्त लायन्स क्लब ऑफ नाशिक सुप्रिमच्यावतीने रविवार कारंजा परिसरातील बाजारपेठेत खिचडीचे पॅकेट वाटप करण्यात आले. यावेळी लायन्स क्लबचे उपप्रांतपाल राजेश कोठावदे, संस्थापक जे.पी. जाधव, विभाग अध्यक्ष बी.बी. पाटील, सतीश कोठारी, जिभाऊ सोनवणे, बी.आर. सावकार आदी उपस्थित होते. एकूण १२०० लाकांनी याचा लाभ घेतला. लायन्स क्लबच्या या उपक्रमाच्यावेळी अभय चोकसी, रितु चौधरी यांनी भेट दिली.