पाथरे महाविद्यालयात होळी सण उत्साहात

By Admin | Updated: March 24, 2016 23:40 IST2016-03-24T23:40:14+5:302016-03-24T23:40:14+5:30

पाथरे महाविद्यालयात होळी सण उत्साहात

Celebrate Holi festival at Paththur College | पाथरे महाविद्यालयात होळी सण उत्साहात

पाथरे महाविद्यालयात होळी सण उत्साहात

पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे हायस्कूल व एस.जी. कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला.
फाल्गुन पौर्णिमेस वसंत ऋतूत येणाऱ्या होळी या सणाचे सांस्कृतिक व ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यासाठी शाळेत प्रतीकात्मक होळीचे आयोजन करण्यात आले होते. पुरोहित किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य विद्या साळुंखे यांच्या हस्ते विधिवत पूजन करून होळी पेटविण्यात आली.
अहंकार, द्वेष, ईर्षा, मत्सर, भेदभाव, आळस, दारिद्र्य आदि दुर्गुणांचे दहन करून सदाचारी जीवन जगण्याचा संदेश होळी देत असल्याचे साळुंखे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी पर्यवेक्षक नामदेव कानसकर, संजय जाधव, उत्तम खैरनार, रंगनाथ चिने, कृष्णाजी घोटेकर, माधव शिंदे, रामचंद्र थोरात, संजय शेलार, सारिका उबाळे, बाबासाहेब डुंबरे, रमेश गडाख, नवनाथ कांबळे, नवनाथ पाटील, प्रशांत दातरंगे, सुदाम भारमल, भारती खंबाईत, भास्कर हांडोरे, वंदना तांबे, सीताराम रानडे, विजय गोर्डे, बाळासाहेब सिरसाठ, रावसाहेब मोकळ, विठ्ठल पानपाटील, गणेश श्रीमंत, अक्षय गोसावी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Celebrate Holi festival at Paththur College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.