बकरी ईद साधेपणाने साजरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:11 IST2021-07-21T04:11:30+5:302021-07-21T04:11:30+5:30

लासलगाव : येत्या २१ जुलै रोजी साजरी करण्यात येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल वाघ यांच्या ...

Celebrate Goat Eid simply | बकरी ईद साधेपणाने साजरी करा

बकरी ईद साधेपणाने साजरी करा

लासलगाव : येत्या २१ जुलै रोजी साजरी करण्यात येणाऱ्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर लासलगाव पोलीस ठाण्याचे सपोनि राहुल वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक झाली. यावेळी वाघ यांनी कोरोना संकट अद्याप टळलेले नसून, मुस्लीम बांधवांनी साधेपणाने बकरी ईद साजरी करावी, असे आवाहन केले. शहरासह पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३८ गावांत कोरोनाबरोबर लढण्याकरिता चांगल्या लॉकडाऊनचे पालन करण्याची आवश्यकता आहे. बकरी ईदसारख्या पवित्र उत्सवाला एकत्र येऊन किंवा कुठे बाहेर न जाता घरीच नमाज पठण करून प्रशासनाला सहकार्य करावे. यावेळी पोउनि. रामकृष्ण सोनवणे, पोउनि. अजिनाथ कोठळे, जामा मशिदीचे मौलाना महेमुद रजा अमजदी, नुरानी मशिदीचे मौलाना मंजूर अहमद मिल्ली, हाफिज तौफिक शेख, इस्माईल मोमीन, अनिस शेख चांदवडकर, लतीफ तांबोळी, सुलेमान मुलानी उपस्थित होते.

Web Title: Celebrate Goat Eid simply