मजदूर संघ कार्यालयात संविधान दिन साजरा
By Admin | Updated: November 26, 2015 22:22 IST2015-11-26T22:21:39+5:302015-11-26T22:22:11+5:30
मजदूर संघ कार्यालयात संविधान दिन साजरा

मजदूर संघ कार्यालयात संविधान दिन साजरा
नाशिकरोड : मजदूरसंघ कार्यालय आयएसपी येथे भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्टाफ युनियनचे जनरल सेक्रेटरी संदीप बिस्वास यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस व कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या हस्ते कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सूत्रसंचालन व संविधान प्रतीचे वाचन राजेश टाकेकर यांनी केले. कार्यक्रमास माधवराव लहांगे, सुनील आहिरे, नंदू पाळदे, उत्तमराव रकिबे, जयराम कोठुळे, उल्हास भालेराव, रमेश खुळे, इरफान शेख, दिनकर खर्जुल, शिवाजी कदम, नंदू कदम, दीपक सुकेणकर, मोहन रावळे, राजू जगताप, कार्तिक डांगे, बाळासाहेब ढेरिंगे, विनोद गांगुर्डे, जगदीश जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)