देवळा येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:50 IST2018-02-13T23:41:23+5:302018-02-13T23:50:51+5:30
देवळा : येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

देवळा येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी
देवळा : येथे वीर एकलव्य यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या प्रमुख उपस्थितीत एकलव्य संघटना शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले. शहरातील एकलव्यनगर येथे वीर एकलव्य यांच्या पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मविप्र संचालक डॉ. विश्राम निकम, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य योगेश अहेर, बाजार समितीचे सभापती अशोक अहेर, शिवसंग्रामचे उदयकुमार अहेर, नगरसेवक बेबी नवरे, अतुल पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी देवळा ग्रामपालिकेचे माजी सरपंच रघू नवरे, उल्हास गुजरे, नईम शेख, कैलास पवार, निखिल अहेर, शांताराम पवार, शाखा अध्यक्ष मुन्ना सोनवणे, राजेंद्र वाघ, महारू वाघ, विकी सोनवणे, निवृत्ती वाघ, सुभाष वाघ, देवा चव्हाण, हेमंत वाघ, गणेश वाघ, हर्षद गांगुर्डे, मनोज सोनवणे, बबलू वाघ, बबन वाघ, राहुल वाघ, राजू सोनवणे, दीपक गोयल, विशाल वाघ, राकेश सोनवणे, गोरख बर्डे, दीपक पवार, बाळासाहेब पवार, गंगाराम वाघ, गोटू वाघ, पवन पानपाटील, उद्धव वाघ आदी कार्यकर्त्यांसह समाजबांधव, नागरिक उपस्थित होते.