विंचूर शहरावर आता सीसीटीव्हीची नजर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 00:48 IST2021-01-16T20:47:14+5:302021-01-17T00:48:04+5:30

विंचूर : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील विंचूर येथील महामार्गासह तीनपाटी भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तीनपाटी भागासह विंचूर शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्ग पोलिसांच्या नजरेत राहणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

CCTV is now watching the city of Vinchur! | विंचूर शहरावर आता सीसीटीव्हीची नजर !

विंचूर शहरावर आता सीसीटीव्हीची नजर !

ठळक मुद्देविंचूरचा गेल्या काही वर्षांपासून नावलोकिक वाढला

विंचूर : नाशिक - औरंगाबाद महामार्गावरील विंचूर येथील महामार्गासह तीनपाटी भागावर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. पोलिसांचा तिसरा डोळा म्हणून काम करणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे तीनपाटी भागासह विंचूर शहरातील प्रवेशाचे प्रमुख मार्ग पोलिसांच्या नजरेत राहणार आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.

औद्योगिक वसाहत, उपबाजार समिती आणि पंचक्रोशीतील सर्व गावांचे केंद्रस्थान म्हणून विंचूरचा गेल्या काही वर्षांपासून नावलोकिक वाढला, तशी येथील वाहतूक आणि नागरिकांची वर्दळही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील नाशिक, येवला, लासलगावला जोडणाऱ्या तीनपाटी भागात प्रवाशांसह परिसरातील नागरिकांची कायम गर्दी असते. विंचूरला शिक्षणासाठी येणाऱ्या तसेच बाहेरगावी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थिनी यांचीही येथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज होती. लासलगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

आयपी कॅमेरे
तीनपाटी भागात चार मेगापिक्सल नाईटव्हिजनचे आयपी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.त्यामुळे नागरिकांमध्ये सुरक्षितता निर्माण होणार आहे. परिसरातील छोटी मोठी गुन्हेगारी पाहता सीसीटीव्हीची गरज वाढली आहे. बसवल्या जाणा-या सीसीटीव्ही कॅमे-यांमुळे गुन्हेगारी रोखण्यासोबतच गुन्हे उघडकीस येण्यास मदत होणार आहे.

गुन्हेगारीवर लक्ष
नाशिक औरंगाबाद महामार्गावरील संपूर्ण तीनपाटी परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीत येणार आहे.कॅमेरे सर्व दिशेस कव्हर करत असल्याने कोणताही परिसर याच्या नजरेतुन सुटत नाही. विंचूरच्या प्रवेशद्वारावरच नजर असल्याने गावात बाहेरुन आलेल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या संशयितांवर लक्ष ठेवता येणार आहे. येथे कनिष्ठ महाविद्यालय असल्याने शाळा परिसर व तीनपाटी भागात विद्यार्थीनींची वर्दळ असते. त्यामुळे मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन सीसीटीव्ही कॅमे-याची गरज होती.

विंचूर महामार्गावरील असल्याने येथे सीसीटीव्हीची गरज होती. पोलीस प्रशासन व जनतेच्या सहकार्यातुन अजुन कॅमेरे बसविण्यात येतील. त्यामुळे बाहेरुन येणा-या गुन्हेगारांवर नजर ठेवता येऊ शकेल.
- राहुल वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक,लासलगाव

वाढती लोकसंख्या आणि उपबाजार समितीमुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. विंचूरच्या प्रवेशद्वारावरच कॅमेरे असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोणातुन गावहिताचा उपक्रम आहे.
-जी.टी.खैरनार,ग्रामविकास अधिकारी

Web Title: CCTV is now watching the city of Vinchur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.