शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल : तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या कानशिलात शिक्षिकेने भडकावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 16:49 IST

गंगापूररोडवरील या शाळेतदेखील असाच प्रकार शुक्रवारी (दि.८) घडला. शिक्षिकेकडून चिमुकल्याला दोन्ही हातांनी कानशिलात केली जाणारी मारहाण वर्गामध्ये असलेला ‘तीसऱ्या डोळ्या’त कैद झाली.

ठळक मुद्देपालकांनी संबंधित शिक्षिका व संस्थाचालकांना याप्रकरणी जाब विचारलासंस्थाचालकाने त्या शिक्षिकेला निलंबीत केल्याचेही स्पष्टीकरण

नाशिक : अक्षरओळख शिकत असताना गंगापूररोडवरील एका प्ले-ग्रूपच्या शाळेत तरूण महिला शिक्षकाने अवघ्या तीन वर्षाच्या चिमुकल्याच्या कानशिलात भडकावल्याच्या गंभीर प्रकार सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशलमिडियातून व्हायरल झाल्यानंतर उघडकीस आला. यानंतर संस्थाचालकांनी तडकाफडकी त्या शिक्षिकेला निलंबीत केले आहे.बालवयातच आपल्या मुलांना अक्षरओळख व्हावी, जेणेकरून त्यांची बुध्दी तल्लख होऊन अभ्यासात अभीरूची वाढेल आणि शाळेचा गोडवा निर्माण होईल, या उद्देशाने पालक मुलांना लहान वयातच बालवाडी, अंगणवाडी, प्ले-ग्रूप, नर्सरी या लहान गटांच्या शाळेत दाखल करतात. या वयात मुलांना गोडीगोडीने अक्षर ओळख करून त्यांच्याशी मिसळून अक्षर ओळख करून देण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून केला जातो; मात्र अनेकदा काही शिक्षकांचा स्वत:वरील ताबा सुटतो आणि अन्य रागाच्या भरात चिमुकल्यांवर त्यांच्याकडून आघात केला जातो, अशा घटना यापुर्वीदेखील घडल्या आहे. यामुळे नागरिकांत संताप व्यक्त होत आहे. गंगापूररोडवरील या शाळेतदेखील असाच प्रकार शुक्रवारी (दि.८) घडला. शिक्षिकेकडून चिमुकल्याला दोन्ही हातांनी कानशिलात केली जाणारी मारहाण वर्गामध्ये असलेला ‘तीसऱ्या डोळ्या’त कैद झाली. त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशलमिडियावरूच चांगलाच गाजला. चिमुकल्याच्या पालकांनी शाळेत धाव घेऊन संबंधित शिक्षिका व संस्थाचालकांना याप्रकरणी जाब विचारला. संस्थाचालकांसह त्या शिक्षिकेनेही चूक मान्य करत त्यांची माफी मागितली. दरम्यान, चिमुकल्याच्या मातेचे हृदय हा सर्व प्रकार बघून हेलावले व त्यांनी थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठले. शिक्षिका तरूण असल्यामुळे भवितव्याचा विचार करत त्यांनी तोंडी तक्रार पोलिसांकडे केली; मात्र लेखी तक्रार करण्यास नकार देत संबंधितांना ‘खाकी’ने समज द्यावी, अशी इच्छा बोलून दाखविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरिक्षक किशोरकुमार मोरे यांनी शिक्षिकेसह संस्थाचालकांना बोलावून घेत पोलीस ठाण्यात समज दिली. या घटनेनंतर संस्थाचालकाने त्या शिक्षिकेला निलंबीत केल्याचेही स्पष्टीकरण यावेळी देण्यात आल्याने घटनेवर पडदा पडला.---लहान मुलांविषयी संवदेनशीलता हवीचलहान गटांच्या शाळेत जेव्हा नोकरी करतो तेव्हा शिक्षकांनी त्यांच्याविषयी अत्यंत संवेदनशील राहण्याची गरज आहे. बालवयातच शिक्षकांविषयीचा आदराचे संस्कार त्यांच्या मनात कसे रूजतील या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. बालवयात अशाप्रकारे मारहाण झाल्यास मोठी दुर्घटनाही घडू शकते, याचे भान शिक्षकांनी ठेवावे. कारण मुलांची शारिरिक व मानसिक क्षमता वयाच्या दृष्टीने कमी असते.--

टॅग्स :SchoolशाळाNashikनाशिकTeacherशिक्षक