उपनगर परिसरात सीसीटीव्हीची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 00:07 IST2017-10-28T00:06:58+5:302017-10-28T00:07:06+5:30
येथील साईबाबा मार्केट परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचा शुभारंभ पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

उपनगर परिसरात सीसीटीव्हीची नजर
उपनगर : येथील साईबाबा मार्केट परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयाचा शुभारंभ पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आला. उपनगर मार्केट परिसरात महिलांची छेडछाड व टवाळखोरांच्या वाढत्या उपद्रवाच्या तक्रारी वाढल्याने परिसरातील नगरसेवक राहुल दिवे, सुषमा पगारे, आशा तडवी यांनी स्वखर्चातुन उपनगर मार्केट परिसरात सीसीटीव्ही बसविण्याचे काम नुकतेच पूर्ण केले. त्या सीसीटीव्ही कॅमेºयांचे उद्घाटन पोलीस उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युगांतर सोशल फाउंडेशनचे रवि पगारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष कौसर आझाद, मोहन पवार, संजय लोखंडे, बापूसिंग पाटील, प्रदीप देशपांडे, रणजित ठाकरे, रफीक तडवी, मनोहर थवानी, अनिल देठे, पवन धांड आदी उपस्थित होते.