सूचेतानगरला सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 23:56 IST2020-03-06T23:55:26+5:302020-03-06T23:56:24+5:30
सूचितानगर येथे नागरिकांच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद््घाटन मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

सूचेतानगरला सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित
इंदिरानगर : सूचितानगर येथे नागरिकांच्या वतीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे उद््घाटन मुंबईनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
‘आपला शेजारी खरा पहारेकरी’ या उपक्रमांतर्गत पोलिसांच्या वतीने आपल्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे परिसरातील घरफोडी, वाहनचोरी, सोनसाखळी चोरीसह विविध गुन्हास यांना आळा बसण्यास मदत होईल या हेतूने अतुल वाणी व रमेश गायकवाड यांनी स्वखर्चाने परिसरात सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसविले. त्यामुळे त्यांचे प्रशस्तिपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरप्रित सिंग बल, तपन शास्त्री, बबलू शेख, आश्विन देसले, स्वामी पाटील, सुबोध बोरसे, गुरदीप भांबरे, अक्षय बाराइत, अमित बनसोडे उपस्थित होते.