सीबीएसला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 01:04 IST2017-12-31T01:03:17+5:302017-12-31T01:04:26+5:30
नाशिक : रस्त्याने पायी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) सायंकाळी जिल्हा न्यायालयासमोरील बसथांब्यावर सायंकाळच्या सुमारास घडली़

सीबीएसला अल्पवयीन मुलीचा विनयभंग
ठळक मुद्देअल्पवयीन मुलीचा पाठलागसंशयित राजेंद्र एकनाथ वाघमारे
नाशिक : रस्त्याने पायी जात असलेल्या अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी (दि़२९) सायंकाळी जिल्हा न्यायालयासमोरील बसथांब्यावर सायंकाळच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी जाण्यासाठी जिल्हा न्यायालयासमोरील बसथांब्याकडे पायी जात होती़ तिचा संशयित राजेंद्र एकनाथ वाघमारे (३४, वाढोली, खंबाळा ता़त्र्यबंकेश्वर) याने पाठलाग करून विनयभंग केला़ याप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.