येवला तालुक्यातील गावांमध्ये खबरदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 23:59 IST2020-04-03T23:59:30+5:302020-04-03T23:59:50+5:30
कोरोना विषाणूचा शिरकाव तालुक्यालगत असणाऱ्या गावांत झाल्याने येवला तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेसर येथे मोठा पाईप आडवा लावून ग्रामस्थांनी मुख्य रस्ता बंद केला आहे.
येवला : कोरोना विषाणूचा शिरकाव तालुक्यालगत असणाऱ्या गावांत झाल्याने येवला तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
निफाड तालुक्यातील लासलगावजवळच्या पिंपळगाव नजीक येथील तीसवर्षीय तरु णाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर रु ग्णाची प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत; मात्र या बातमीने लासलगावशी दैनंदिन संबंध येणाºया येवला तालुक्यातील आंबेगाव, शिरसागाव लौकी, सोमठाण देश, निळखेडे, वळदगाव या गावांमध्य विशेष खबरदारी घेतली जात आहे. ग्रामपंचायतीने खबरदारीची उपाययोजना म्हणून ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करून जंतुनाशक औषधांची फवारणी केली आहे. तसेच काही ठिकाणी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरही वाटप केले आहे. तर काही ग्रामपंचायतींनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावबंदी मोहिम राबविली आहे. त्यानुसार गावातील रस्त्यांवर मोठे पाइप लावून सीमा सील करण्यात आल्या आहेत.