नव्या स्ट्रेन विषाणूमुळे दक्षतेच्या सूचना :पालकमंत्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 12:28 AM2021-01-11T00:28:11+5:302021-01-11T00:29:22+5:30

स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची मोहीम या महत्त्वाच्या बाबींबरोबरच नव्याने आलेल्या स्ट्रेनसंदर्भतही दक्षता बाळगावी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 

Caution against new strain virus: Guardian | नव्या स्ट्रेन विषाणूमुळे दक्षतेच्या सूचना :पालकमंत्री

नव्या स्ट्रेन विषाणूमुळे दक्षतेच्या सूचना :पालकमंत्री

Next
ठळक मुद्देकोरोना आढावा बैठकीत आरोग्यविषयक चर्चा

नाशिक : स्ट्रेन विषाणूचा संसर्ग पसरण्याचा कालावधी कमी असल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनावरील लक्ष, लसीकरणाची मोहीम या महत्त्वाच्या बाबींबरोबरच नव्याने आलेल्या स्ट्रेनसंदर्भतही दक्षता बाळगावी लागणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित करण्यात   कोरोना आढावा बैठकी प्रसंगी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस उपाधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे,  आदि उपस्थित होते. यावेळी  भुजबळ  यांनी ब्रिटन स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर टेस्टिंगचे प्रमाण वाढविण्यात यावे, परदेशातून कुणी प्रवासी, जर नाशिकला येत असेल, अशा प्रवाशांची माहिती  प्रशासनाला द्यावी, असे मुंबई प्रशासनास सांगण्यात आले असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले.  
रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेचे ऑडिट भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांच्या विद्युत व्यवस्थेची सार्वजनिक बांधकाम व अग्निशमन विभागाकडून तपासणी करण्यात येऊन, त्याबाबत नियमितपणे देखभाल दुरुस्ती करण्यात यावी. त्याचप्रमाणे, फायर एक्स्टिंग्विशर हाताळणीसंदर्भातही कर्मचारी यांना प्रशिक्षण देणे आवश्यक असल्याने, संबंधितांना त्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

Web Title: Caution against new strain virus: Guardian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.