कावडीधारक सप्तशृंगगडाकडे रवाना
By Admin | Updated: October 13, 2016 23:42 IST2016-10-13T23:33:16+5:302016-10-13T23:42:32+5:30
कावडीधारक सप्तशृंगगडाकडे रवाना

कावडीधारक सप्तशृंगगडाकडे रवाना
त्र्यंबकेश्वर : येथील कुशावर्तातील तीर्थाने कोजागरी पौर्णिमेला सप्तशृंगदेवीला जलाभिषेक घालण्याची परंपरा पूर्वापार चालत आली असून, त्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावांमधील कावडधारक त्र्यंबकेश्वर येथे येऊन कावडीत जल भरून नेत आहेत. अभिषेकाचा प्रथम मान त्र्यंबकेश्वरच्या कावडधारकांना मिळत असल्याने येथे
येणाऱ्या कावडधारकांची संख्या वाढली आहे.
पूर्वी २ ते ३ जणच कावडी घेऊन जात होते. त्यात अंबादास पंत सोनवणे सहकारी कावड घेऊन न चुकता गडावर जात असत. बाहेरगावाहून कावड नेणारे जुने-नवे कावडधारक येथे येऊ लागल्याने कावडीसाठीचे साहित्य येथे मिळू लागले आहे.
त्यात कावड घेऊन पाण्यासाठी लागणारे दोन लोटे, नारळ, दोरी (काडीला कावड बांधण्यासाठी) असे भगवे टी-शर्ट, भगवे वस्र, पॅन्ट वगैरे साहित्याची दुकाने लागली असून, कावडीवाले येथूनच नटून सजून जातात. परगावचे व स्थानिक असे कावडीवाले हजारोंच्या घरात किंबहुना त्याहीपेक्षा जात असतील. दरम्यान, अश्विन शु १४ शनिवारी (दि. १५) गडावर यात्रा भरत असून, लाखोंच्या संख्येने भाविक जात असतात. (वार्ताहर)