गोवंशाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:14 AM2019-10-13T01:14:20+5:302019-10-13T01:15:40+5:30

गायी व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलीच्या इराद्याने चोरटी वाहतूक करणाºया चार संशयितांना जायखेडा पोलिसांनी ताहाराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. तसेच वाहनांसह एकूण सहा लाख ५२ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Cattle smugglers arrested | गोवंशाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना अटक

गोवंशाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांना अटक

Next

जायखेडा : गायी व गोºहे पिकअप वाहनात निर्दयीपणे कोंबून गुजरातकडून मुल्हेरमार्गे मालेगावकडे कत्तलीच्या इराद्याने चोरटी वाहतूक करणाºया चार संशयितांना जायखेडा पोलिसांनी ताहाराबाद चौफुलीवर ताब्यात घेतले. तसेच वाहनांसह एकूण सहा लाख ५२ हजारांचा ऐवज हस्तगत केला असून, चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जायखेडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी स्वप्निल कोळी, सुनील पाटील, निंबा खैरनार, उमेश पाटील, भालचंद्र नेरकर, उमेश भदाणे, राजेंद्र गायकवाड, भवर आदी शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास गस्तीवर असताना ताहाराबाद चौफुलीवर मालेगावकडे भरधाव जाणारी पिकअप (एमएच ०४ डीके ६३८८) व दुसरी पिकअप ( एमएच ०४ डीएस ६९३५) पोलिसांनी अडविली. दोन्ही वाहनांची तपासणी केली असता त्यात जवळपास पंधरा गायी व गोºहे निर्दयीपणे कोंबलेले आढळले. चालक मुस्तफा खान अफजल खान, शेख रईस शेख युनुस, नईम अहेमद हाफीज अहेमद अन्सारी, शेख रजिवान शेख मुख्तार (रा. मालेगाव) यांना अटक केली.
ताब्यात घेतलेल्या जनावरांना गंभीर जखमा झाल्या होत्या. जायखेडा पोलीस ठाणे आवारात जनावरांवर खासगी पशुवैद्य व सहकाऱ्यांनी उपचार केले. गावकºयांनी जनावरांच्या चाºयाची सोय केली. वाहनात एक लहान वासरू दबल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Cattle smugglers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.