खाऊगल्ली खाद्य महोत्सवात खवय्यांची गर्दी

By Admin | Updated: May 24, 2014 00:18 IST2014-05-23T23:10:45+5:302014-05-24T00:18:09+5:30

नाशिक : पावभाजी, कबाब, रोल, काठियावाडी कुल्फ ी, चायनीज पदार्थ अशा एकापेक्षा एक लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी नाशिककरांना चाखायला मिळाली़

Cattle crowd at Khagalli Food Festival | खाऊगल्ली खाद्य महोत्सवात खवय्यांची गर्दी

खाऊगल्ली खाद्य महोत्सवात खवय्यांची गर्दी

नाशिक : पावभाजी, कबाब, रोल, काठियावाडी कुल्फ ी, चायनीज पदार्थ अशा एकापेक्षा एक लज्जतदार खाद्यपदार्थांची मेजवानी नाशिककरांना चाखायला मिळाली़
हॉटेल एक्स्प्रेस इन येथे आयोजित केलेल्या खाऊगल्ली महोत्सवात नाशिककरांनी या पदार्थांचा अस्वाद लुटला़ हुबेहुब मुंबई चौपाटीचा अनुभव देणार्‍या या महोत्सात एकापेक्षा एक खाद्यपदार्थ उपलब्ध करण्यात आले आहे. व्हेज, नॉनव्हेजसह पंजाबी, गुजराथी खाद्यपदार्थ उपलब्ध असल्याने खवय्यांची गर्दी होत आहे.़ याचबरोबर कुल्फ ी, सोडा, बर्फ गोळा, फ ालूदा आदि थंड पदार्थही खव्वयांच्या चांगले पसंतीस उतरले़ याचबरोबर मुंबई चौपाटीवर फि रणारे मॅजिशियन, फ ोटोग्राफ र, चहावाला, भेळभत्तावाला, चणे फु टाणेवालाही या ठिकाणी असल्याने नाशिककरांना मुंबई चौपाटीवर असणार्‍या तेथील खाद्यपदार्थांची चव चाखण्याचा अनुभव मिळाला़ रविवार पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Cattle crowd at Khagalli Food Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.