युवकाच्या हत्त्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
By Admin | Updated: May 21, 2014 23:41 IST2014-05-21T23:37:57+5:302014-05-21T23:41:12+5:30
एकलहरारोडवरील प्रकार : चुलतभाऊ व आतेभावाने केली हत्त्या

युवकाच्या हत्त्येप्रकरणी दोघांना जन्मठेप
एकलहरारोडवरील प्रकार : चुलतभाऊ व आतेभावाने केली हत्त्या
नाशिक : नात्याने चुलतभाऊ व आतेभाऊ असलेल्या दोघांनीच बारामती येथील युवकाची हत्त्या केल्याचे न्यायालयात सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी दोघा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़
या खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, पुणे जिल्ातील बारामती येथील अमित दिलीप जगदाळे यास त्याचा सख्खा चुलतभाऊ राजू कांतीलाल जगदाळे व आतेभाऊ अनिल रामचंद्र घाडगे या दोघांनी २००१ मध्ये फूस लावून नाशिकला पळवून आणले़ अमितला एकलहरारोडवरील किर्लोस्कर डोंगर येथे नेऊन गळफ ास दिला़ या घटनेनंतर हे दोघेही फ रार झाले होते़ या दोघांनाही २०१२ मध्ये पोलिसांनी अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले़
जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती सुचित्रा घोडके यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता़ न्यायालयासमोर आलेल्या साक्षी-पुराव्यांनुसार आरोपी राजू कांतीलाल जगदाळे व अनिल रामचंद्र घाडगे यांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली़ या खटल्यात सरकारी पक्षातर्फे ॲड़ कल्पक निंबाळकर, ॲड़ प्रकाश ताजनपुरे, ॲड़ शोभा ताजनपुरे यांनी काम पाहिले़ (प्रतिनिधी)