विवाहिता आत्महत्येप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:44 IST2017-09-04T00:44:15+5:302017-09-04T00:44:30+5:30
इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़

विवाहिता आत्महत्येप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल
नाशिक : इंदिरानगर परिसरातील समर्थनगरमधील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि़२) रात्रीच्या सुमारास घडली़ सोनाली विनोद पवार (२४, रा. गणराज अपा. समर्थनगर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे़ मूल होत नाही तसेच माहेरून पैसे आणत नाही, या कारणावरून सासरच्यांच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याची फिर्याद मुलीच्या आईने दिली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सोनालीची आई शोभा उत्तम गायकवाड यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार चार वर्षांपूर्वी मुलीचा विवाह विनोद यशवंत पवार याच्याशी झाला़ विवाहानंतर पती विनोद, सासू भारती, दीर राजेंद्र यांनी मुलीचा शारीरिक व मानसिक छळ सुरू केला़ याबाबत अनेकदा या तिघांची समजूतही काढली मात्र उपयोग झाला नाही़ सोनालीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मिळालेल्या पैशातून काही पैसे मिळावे यासाठी तिच्या सासरच्यांनी छळ सुरू केला होता़ या कारणावरून मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली़ यास पती, सासू व दीर हे जबाबदार असल्याचे शोभा गायकवाड यांनी फिर्यादीत म्हटले आहे़