अर्भक मृत्यू प्रकरणी बिटको रुग्णालयाच्या डॉक्टरांना घेराव
By Admin | Updated: May 9, 2014 23:15 IST2014-05-09T23:14:16+5:302014-05-09T23:15:55+5:30
नातेवाइकांचा हलगर्जीपणाचा आरोप

अर्भक मृत्यू प्रकरणी बिटको रुग्णालयाच्या डॉक्टरांना घेराव
नातेवाइकांचा हलगर्जीपणाचा आरोप
नाशिक : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चार दिवसांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संतप्त नातेवाईकांनी नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टरांना शुक्रवारी रात्री घेराव घातला़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे घटनास्थळी पोहोचल्याची माहिती सूत्रांनी दिली़ याबाबत अधिक माहिती अशी की, आफ रीन शेख या महिलेची चार दिवसांपूर्वी बिटको रुग्णालयात प्रसूती होऊन तिला मुलगा झाला़ या मुलाची गुरुवारी तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांना दाखविण्यात आले़ डॉक्टरांनी तपासून मुलगा नॉर्मल असल्याचे सांगितले़ यानंतर गुरुवारी उपचार सुरू असताना या मुलाचा मृत्यू झाला़ या घटनेनंतर शेख यांच्या सुमारे शंभर-दीडशे नातेवाईकांनी शुक्रवारी रात्री बिटको रुग्णालयाच्या डॉक्टरांना घेराव घातला़ दरम्यान, घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचल्याची माहिती मिळते़ दरम्यान, रात्री उशिरापर्यंत या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली नव्हती़ (प्रतिनिधी)