बालिकेवर अत्याचार करून जिवे मारल्याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2020 12:58 AM2020-11-30T00:58:36+5:302020-11-30T00:59:33+5:30

पेठ तालुक्यातील कोपूर्ली खु. येथील अल्पवयीन मुलीस तिरडे येथील संशयित दत्तू खैर याने ओळखीचा फायदा घेऊन प्रारंभी राहते घरातून फूस लावून पळवून नेले व अत्याचार करून जिवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

A case has been registered with the Peth police for torturing and killing a girl | बालिकेवर अत्याचार करून जिवे मारल्याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल

बालिकेवर अत्याचार करून जिवे मारल्याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल

Next

पेठ : तालुक्यातील कोपूर्ली खु. येथील अल्पवयीन मुलीस तिरडे येथील संशयित दत्तू खैर याने ओळखीचा फायदा घेऊन प्रारंभी राहते घरातून फूस लावून पळवून नेले व अत्याचार करून जिवे मारल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याबाबत पेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अल्पवयीन पीडितेस संशयिताने पळवून नेल्याचा प्रकार घडल्यापासून नातेवाइकांनी शोध घेऊनही न सापडल्याने तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शोध घेतला असता संशयिताने तिच्यावर अत्याचार करून जिवे मारल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पोलीस निरीक्षक राधेश्याम गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसावे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A case has been registered with the Peth police for torturing and killing a girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.