युवतीची छेड युवकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 15:50 IST2020-11-22T15:49:39+5:302020-11-22T15:50:15+5:30
पंचवटी : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन युवतीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी फोनवर का बोलत नाही असे म्हणून युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी वाघाडीत राहणाऱ्या संशयित उदय जयंत जगताप याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

युवतीची छेड युवकावर गुन्हा दाखल
पंचवटी : रस्त्याने जाणाऱ्या अल्पवयीन युवतीला रस्त्यात अडवून तू माझ्याशी फोनवर का बोलत नाही असे म्हणून युवतीचा पाठलाग करून विनयभंग केल्या प्रकरणी वाघाडीत राहणाऱ्या संशयित उदय जयंत जगताप याच्यावर बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत परिसरात राहणाऱ्या पिडीत युवतीने पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. गेल्या शुक्रवारी पिडीत युवती आडगाव नाक्याकडून निमाणीकडे पायी जात असतांना
संशयित आरोपी जगताप याने दुचाकीवर येऊन युवतीशी बोलण्याचा प्रयत्न करत तिला रस्त्यात अडवून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. सदर प्रकरणाबाबत युवतीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी जगताप याला अटक केली आहे.