ग्रामपालिका कर्मचारी बुडून मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2020 17:19 IST2020-09-05T17:18:42+5:302020-09-05T17:19:20+5:30

पिंपळगाव बसवंत : गणपती विसर्जन करताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा वरिष्ठ स्तरार तपास करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बसपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आॅनलाइन निवेदनाद्वारे केली आहे.

A case of culpable homicide should be filed in the case of drowning death of a village employee | ग्रामपालिका कर्मचारी बुडून मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

ग्रामपालिका कर्मचारी बुडून मृत्यू प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा

ठळक मुद्दे पिंपळगाव बसवंत : बसपाची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

पिंपळगाव बसवंत : गणपती विसर्जन करताना ग्रामपालिका कर्मचाºयाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेचा वरिष्ठ स्तरार तपास करून दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बसपातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे आॅनलाइन निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील ग्रामपंचायत कर्मचारी रवी मोरे याचा कर्तव्य बजावत असताना मंगळवारी (दि.१) कादवा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. याबाबत सखोल चौकशी होऊन प्रशासनाविरु द्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, तसेच मृत कर्मचाºयाच्या पत्नीस ग्रामपालिकेत कायमस्वरूपी कामावर घेऊन वारसांना प्रत्येकी पाच लाख रु पये मदत ग्रामपालिकेमार्फत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गणपती विसर्जन करतांना कर्मचाºयांना लाईफ जॅकेट अपूर्ण होते. प्रशिक्षित कर्मचाºयांचीच ड्युटी ग्रामसेवकाने लावायला पाहिजे होती. मात्र, प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच या कर्मचाºयाचा मृत्यू झाला. पोलीस विभागामार्फत चौकशी होऊन कर्मचाºयास न्याय मिळावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: A case of culpable homicide should be filed in the case of drowning death of a village employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.