कोरोनाबधित मृत्युमुखी झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:19 IST2021-04-30T04:19:35+5:302021-04-30T04:19:35+5:30

_________ नाशिक : एकीकडे नाशिक शहर व परिसरामध्ये कोरोना वेगाने फैलावत असताना दुसरीकडे कोरोनाने रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त ...

In case of coronary death, report to the nearest police station | कोरोनाबधित मृत्युमुखी झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या

कोरोनाबधित मृत्युमुखी झाल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्या

_________

नाशिक : एकीकडे नाशिक शहर व परिसरामध्ये कोरोना वेगाने फैलावत असताना दुसरीकडे कोरोनाने रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाईकांकडून रुग्णालयांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबधित रुग्ण दगावल्यास त्याची लेखी माहिती तत्काळ आपल्या जवळच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना कळविणे बंधनकारक असल्याचा नवा आदेश गुरुवारी (दि.२९) पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी काढला आहे.

कोरोनाविरुद्धची लढाई तीव्र झालेली असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून थेट हॉस्पिटल आणि डॉक्टरांवर हल्ले होऊ लागल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. असे प्रकार टाळण्यासाठी पांडेय यांनी नियमावलीच जाहीर केली आहे.

रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा संयम हरवून हल्ल्यांच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी रात्री मुंबई नाका भागातील याच दिवशी सातपूर भागातील कार्बन नाका आणि इंदिरानगर येथील एका डॉक्टरसह त्याच्या पत्नीवर हल्ला करण्यात आला होता तसेच नाशिक रोड भागातसुद्धा गुरुवारी अशाचप्रकारे एका रुग्णालयावर हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी एक नियमावली जाहीर केली आहे. यापुढे कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने त्वरित याबाबत जवळच्या पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना माहिती कळविणे बंधनकारक आहे.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षकाने आपल्या पातळीवर चौकशी करून हल्ला होण्याची शक्यता असल्यास त्याची खात्री करून हल्ले रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे म्हटले आहे.

--

Web Title: In case of coronary death, report to the nearest police station