नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:44 IST2018-02-26T16:44:51+5:302018-02-26T16:44:51+5:30

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पाठीमागून पेटल्याचे पाहिल्यानंतर दुचाकीस्वाराने कारला ओव्हरटेक करीत चालकास कल्पना दिल्याने मोठा अनर्थ टळला.

Cars running on Nashik-Pune highway | नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पेटली

नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पेटली

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर चालती कार पाठीमागून पेटल्याचे पाहिल्यानंतर दुचाकीस्वाराने कारला ओव्हरटेक करीत चालकास कल्पना दिल्याने मोठा अनर्थ टळला. सिन्नर तालुक्यातील मोहदरी येथील लहानू मुरलीधर करवर यांच्या मुलाचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला आहे. मुलास सिन्नर येथील रुग्णालयात फेर तपासणीसाठी घेवून येत सदर घटना घडली. करवर हे त्यांची पत्नी व मुलास कारने (क्र. एम. एच. ०४ बी. के. ४६२६) सिन्नरकडे येत असतांना पाठीमागून कारने पेट घेतला. कारच्या पाठीमागे असलेल्या दुचाकीस्वाराच्या सदर घटना लक्षात आली. त्याने कारला ओव्हरटेक करीत चालक करवर यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी तातडीने कार रस्त्याच्या कडेला उभी केली. करवर कुटंबिय सुरक्षीत बाजूला गेल्यानंतर कारने पेट घेतला. एमआयडीसी व सिन्नर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबास माहिती दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. एमआयडीसीच्या आग्निशामक बंबाने आग विझविली. मात्र तोपर्यंत कारचे नुकसान झाले होते. दुचाकीस्वाराने दाखविलेल्या प्रसंगावधानाने सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

Web Title: Cars running on Nashik-Pune highway

टॅग्स :Nashikनाशिक